RCB vs GT IPL 2026: आज (शुक्रवार, 24 एप्रिल 2026) आयपीएलचा 34 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रंगणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं या हंगामात आतापर्यंत 6 सामने खेळले असून 4 विजय आणि 2 पराभवांसह 8 गुण मिळवले आहेत. सध्या ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. मात्र, मागील सामन्यात त्यांना दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
तर दुसरीकडे गुजरातनं 6 सामन्यांपैकी 3 सामने जिंकले असून 6 गुणांसह ते सातव्या स्थानावर आहे. मागील सामन्यात मुंबई इंडियन्सनं त्यांचा तब्बल 99 धावांनी पराभव केला होता. आता त्यांचं लक्ष आजच्या सामन्यावर असेल. त्यांना आणि चाहत्यांना आशा आहे की, आजचा आरसीबीविरुद्धचा सामना ते जिंकतील आणि आपल्या गुणांमध्ये भर टाकतील.
एकमेकांविरुद्धचा रेकॉर्ड (Head-to-Head)
आयपीएलच्या इतिहासात या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली आहे. कारण दोन्ही संघ समान ताकदीचे वाटत आहेत. यांच्यात आतापर्यंत 6 सामने झाले आहेत आणि यातील 3 सामने आरसीबीनं जिंकले आहेत तर 3 सामने गुजरातनं जिंकले आहेत. आज जो संघ जिंकेल तो संघ आघाडी घेईल.
आरसीबीचे दोन खेळाडू न खेळण्याची शक्यता
आजच्या सामन्यात देवदत्त पडिक्कल दुखापतीमुळे खेळण्याबाबत शंका आहे, कारण त्याला सरावादरम्यान हाताला दुखापत झाली होती. रोमारिओ शेफर्डच्या उपलब्धतेबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. पण शेफर्ड जर खेळला नाही तर, त्याच्या जागी जॅकोब बेथेल सारख्या खेळाडूला संधी मिळण्याची चर्चा आहे. तर देवदत्तच्या जागी व्यंकटेश अय्यर हा खेळू शकतो.
आजची संभाव्य प्लेइंग 11
RCB: फिल साल्ट, विराट कोहली, व्यंकटेश अय्यर, रजत पाटीदार (कर्णधार), टिम डेव्हिड, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, रसिख सलाम डार, सुयश शर्मा
GT: साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोश बटलर (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्रा, राहुल तेवाटिया, वॉशिंग्टन सुंदर, रशिद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आर. साईकिशोर
आणखी हेही वाचा
चेन्नईविरूद्ध मुंबईने खेळवले ‘१३’ खेळाडू-https://agcsport.tv/cricket/mumbai-fielded-13-players-against-chennai/
बार्सिलोना संघाची स्पेनमध्ये ऐतिहासिक कामगिरी-https://agcsport.tv/football/barcelona-historic-performance-in-spain/

