चेन्नईविरूद्ध मुंबईने खेळवले ‘१३’ खेळाडू

IPL 2026: आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्या सामन्यात असं काही घडलं की, सगळे चाहते थक्क झाले आहेत. या सामन्यात मुंबईनं 13 खेळाडू खेळवले पण तरीही त्यांचा पराभव झाला. चेन्नईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 207 धावा धावफलकावर लावल्या. तर या धावांचा पाठलाग करताना 19 षटकात 104 धावांवरच मुंबईचा संपुर्ण संघ बाद झाला. चेन्नईनं त्यांच्याविरूद्ध 103 धावांनी विजय मिळवला आणि हा आतापर्यंतच्या इतिहासात मुंबईविरूद्ध सगळ्यात मोठा विजय होता. पण या सामन्यात एका मुद्द्यावरून जोरदार वाद चालू आहे की, मुंबईनं 13 खेळाडू खेळवले.

सीएसके जेव्हा फलंदाजी करत होता त्यावेळी 17 व्या षटकात मुंबईचा फिरकी गोलंंदाज मिचेल सँटनर यानं कार्तिक शर्माचा झेल घेताना दुखापत झाली. सुरूवातीला असं वाटलं की, त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे पण मेडिकल तपासणीत समोर आलं की त्याचं डोकं जमिनीला लागलं आहे. त्याच्याच परिणामी कन्कशन म्हणून मुंबईनं शार्दुल ठाकुरला मैदानावर खेळण्याची परवानगी मागितली आणि ती लगेच मंजूर झाली.

क्रिकेटच्या नियमानुसार सामन्यात 11 च खेळाडू खेळू शकतात पण आयपीएल (IPL) च्या इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमामुळे संघात 12 खेळाडूसोबत खेळू शकतात, पण सीएसके आणि मुंबईच्या सामन्यात मुंबईनं 13 खेळाडू खेळवले आहेत. कन्कशन सब्स्टीट्यूट नियमामुळे हा 13 वा खेळाडू त्यांना खेळवता आला आहे. पण सोशल मीडियावर या नियमाविषयी जोरदार चर्चा चालू आहे.

काय विचारले जात आहे?
सोशल मीडियावर प्रश्न विचारला जात आहे की, कन्कशन सब्स्टीट्यूट डोक्याला दुखापत (हेड इंज्युरी) झाल्यावर हा नियम असतो, पण इथे त्याच्या (मिचेल सँटनर) डोक्याला दुखापत झाली नव्हती तरीही कन्कशन त्याला दिलं, जे नियमात बसत नाही. सोशल मीडियावर हे बोललं जात आहे की सेंटनरच्या खांद्याला दुखापत झाली नसून डोक्याला झाली होती.

हा नियम काय आहे?
नियमानुसार जर सामन्यादरम्यान कोणत्याही खेळाडूला डोक्याला दुखापत झाली आणि त्याला ‘कन्कशन’ सब्स्टीट्यूट दिलं जातं. आणि त्या खेळाडूच्या जागी दुसरा खेळाडू खेळू शकतो. म्हणजे जर एखाद्या फलंदाजाला दुखापत झाली तर त्याच्या जागी फलंदाजच येईल आणि जर गोलंदाजाला दुखापत झाली तर गोलंदाजच सब्स्टीट्यूट येईल.

आणखी हेही वाचा
सीएसकेने केला मुंबईविरूद्ध मोठा रेकॉर्ड-
https://agcsport.tv/cricket/csk-made-a-big-record-against-mumbai/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.