PBKS vs LSG: आयपीएल 2026 च्या हंगामात आपली विजयी घोडदौड कायम राखणारा पंजाब किंग्स (PBKS) संघ आज आपल्या घरच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध खेळणार आहे. मुल्लनपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा खेळवला जाणार आहे. सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या पंजाबसमोर लखनऊच्या जायंट्सना रोखण्याचे मोठं आव्हान असेल.
यंदाच्या हंगामात पंजाब किंग्सचा संघ “टेबल टॉपर” असून त्यांनी 5 सामन्यांपैकी 4 सामन्यांत शानदार विजय (एक अनिर्णित) मिळवले आहेत. मागील सामन्यात मुंबई इंडियन्सचा 7 गड्यांनी पराभव केल्यामुळे संघाचं मनोधैर्य उंचावलेलं आहे. दुसरीकडं, लखनऊ सुपर जायंट्ससाठी हा हंगाम संमिश्र राहिला आहे. 5 सामन्यांपैकी फक्त 2 विजय मिळवून ते सध्या आठव्या स्थानावर आहेत. मागील सामन्यात आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर लखनऊचा संघ विजयाच्या मार्गावर परतण्यासाठी आज प्रयत्न करतील.
हेड-टू-हेड रेकॉर्ड
या दोन्ही संघातील सामने नेहमीचं चुरशीचे पाहायला मिळतात. आयपीएल इतिहासात आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये 6 सामने झाले असून, दोघांनीही प्रत्येकी 3-3 विजय मिळवले आहेत. त्यामुळे आज जो संघ जिंकेल, तो एकमेकांविरुद्धच्या रेकॉर्डमध्ये आघाडी घेईल.
लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे चिंता आहे. पंतला आरसीबीविरूद्धच्या सामन्यात हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्या संघात आणि त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जर तो आज खेळला नाही तर संघाला कोणाला स्थान देतील याकडे अनेकांचं लक्ष लागले आहे.
आजची संभाव्य प्लेइंग 11 काय असेल?
पंजाब किंग्स: प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, श्रेयस अय्यर (कर्णधार), कूपर कोनोली, नेहल वढेरा, मार्कस स्टॉयनीस, शशांक सिंग, मार्को यानसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
लखनऊ सुपर जायंट्स: मिचेल मार्श, एडन मारक्रम, ऋषभ पंत/निकोलस पूरन, आयुष बदोनी, हिम्मत सिंग, मुकुल चौधरी, मयंक यादव, मोहम्मद शमी, आवेश खान, प्रिन्स यादव.

