Khaleel Ahmad IPL 2026: आयपीएलचा पाच वेळा विजेता असलेला चेन्नई सुपर किंग्स संघाच्या अडणीत आणखी वाढ झाली आहे. आयपीएल 2026 चालू होण्यापुर्वीच अनेक खेळाडू सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकले आहेत तर काही संपुर्ण हंगामालाच मुकले आहेत. त्यातच आता आणखी एक झटका सीएसके संघाला बसला आहे. सीएसकेच्या संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजापैकी असलेला खलील अहमद याला 14 एप्रिल रोजी कोलकत्ता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली आहे, त्यामुळे तो यंदाच्या संपुर्ण हंगामातून बाहेर पडला आहे, अशी अधिकृत माहिती चेन्नईनं सोशल मीडियावर सांगितली आहे.
OFFICIAL ANNOUNCEMENT
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 16, 2026
Khaleel Ahmed has been ruled out of IPL 2026 after sustaining a right quadricep injury in the game against KKR.
Wishing Khaleel a speedy recovery.#WhistlePodu pic.twitter.com/PFQz3iSWRq
सीएसके संघानं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत तर त्यातील पहिल्या तीन सामन्यात त्यांना सलग पराभवाचा स्विकार करावा लागला होता. पण त्यानंतर सीएसकेनं पुनरागमन केलं आणि सलग दोन्ही सामन्यांत विजय मिळवला. पण नुकत्याच झालेल्या केकेआरविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात खलील अदमद याला कमरेत अस्वस्थता जाणवू लागली आणि तो मैदान सोडून गेला. त्याच्या वैद्यकीय तपासणीत सांगितलं गेलं की, तो सामने खेळू शकणार नाही त्यामुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यानं यंदाच्या आयपीएल हंगामात पाच सामने खेळले आहेत आणि 2 विकेट्स घेतल्या आहेत.
खलील अहमदच्या जागी सीएसकेच्या ताफ्यात कोणाला मिळू शकते संधी?
वृत्तांनुसार, आयपीएल 2026 हंगामाच्या उर्वरित सामन्यांसाठी सीएसके संघात खलील अहमदची जागा घेण्यासाठी आकाश मधवाल आघाडीवर आहे.
उत्तराखंडचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज या (खलील अदमदच्या जागी) पदासाठी आघाडीवर आहे. हैदराबादमध्ये सीएसकेच्या नेट्समध्ये गोलंदाजी करताना आणि संघाची पिवळी सराव जर्सी परिधान केलेला तो (मधवाल) दिसला. अधिकृत कराराची अद्याप पुष्टी झालेली नसली तरी, अनेक वृत्तांनुसार ही रिक्त जागा भरण्यासाठी तो आघाडीचा खेळाडू असल्याच सिद्ध होत आहे.
2026 च्या मेगा-लिलावात विकला न गेलेला मधवाल, मुंबई इंडियन्ससाठी नेट बॉलर म्हणून काम करत होता. त्याची आयपीएलमधील कामगिरी प्रभावी आहे: 17 सामन्यांमध्ये 25.65 च्या सरासरीनं आणि 10.06 च्या इकॉनॉमीनं 23 बळी घेतले आहेत. 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना तो प्रसिद्धीच्या झोतात आला, जेव्हा त्यानं लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात फक्त 3.3 षटकांत 5/5 अशी विक्रमी कामगिरी केली, जी आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीपैकी एक आहे.
गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून त्याची कामगिरी म्हणावी तितकी प्रभावी राहिली नाही आणि मिनी लिलावात तो विकला गेला नाही. पण सध्या सीएसके प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्यानं, मधवालच्या संभाव्य आगमनामुळे संघाला अत्यंत आवश्यक असलेली ताकद मिळू शकते.
आणखी हेही वाचा
भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी-https://agcsport.tv/football/disappointing-performance-of-the-indian-team/
युकी भांब्री-मायकल व्हीनसचे आव्हान सेमिफायनलमध्ये संपुष्टात-https://agcsport.tv/tennis/yuki-bhambri-michael-venus-challenge-ends-in-semifinals/

