पंजाबची पहिल्या स्थानी झेप; मुंबईने कुठे गमवला सामना

MI vs PBKS IPL 2026: नुकत्याच (16 एप्रिल 2026) झालेल्या झालेल्या आयपीएलच्या 24 व्या सामन्यात पंजाब किंग्स (PBKS) संघानं मुंबई इंडियन्स (MI) वर 7 गड्यांनी मोठा विजय मिळवला. या विजयामुळे पंजाब किंग्स सध्या सगळे सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर पार पडला.

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 195 धावांचा आव्हानात्मक स्कोअर उभा केला. सुरूवातीलाच मुंबईच्या संघाच्या लागोपाठ विकेट्स पडल्या होत्या. त्यामुळे संघावर दबाव आला. पण मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी कॉकनं आपल्या पुनरागमनाच्या सामन्यात फक्त 60 चेंडूंत नाबाद 112 धावांची (7 चौकार, 7 षटकार) शानदार शतकी खेळी केली. त्याला नमन धीरनं 31 चेंडूंत 50 धावांची मोलाची साथ दिली. पंजाबकडून अर्शदीप सिंगनं सर्वाधिक 3 बळी टिपले.

196 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना पंजाब किंग्सच्या संघाचीही विकेट पडली. पण नंतर पंजाबच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीची दाणादाण उडवली. सलामीवीर प्रभसिमरन सिंगनं फक्त 39 चेंडूंत नाबाद 80 धावांची (11 चौकार, 2 षटकार) वादळी खेळी केली. त्याला कर्णधार श्रेयस अय्यरनं 35 चेंडूंत 66 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पंजाबनं हे लक्ष्य फक्त 16.3 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 198 धावा करून सहज पूर्ण केले आणि 21 चेंडू राखून विजय मिळवला.

सामना कुठे फिरला?
हा सामना मुंबईच्या गोलंदाजीच्या अपयशामुळे फिरला. जसप्रीत बुमराहसारखा दिग्गज गोलंदाज या सामन्यात 4 षटकांत 41 धावा देऊन विकेटलेस राहिला. पंजाबच्या फलंदाजांनी पॉवरप्लेमध्येच 61 धावा कुटून विजयाचा पाया रचला होता. तसेच कालच्या सामन्यात अनेकदा मुंबईच्या संघानं क्षेत्ररक्षणात चुका केल्या. बुमराहकडं प्रभसिमरन ११ धावांवर असताना झेल आला पण त्याला तो झेल घेता आला नाही आणि त्यानं सगळा सामनाच फिरवला. प्रभसिमरन यानं कर्णधार श्रेयस अय्यरसोबत 139 धावांची भागीदारी यशस्वी खेळी केली, ज्यामुळे 195 धावांचं मोठं आव्हानही तोकडं पडलं.

पंजाब किंग्स सध्या गुणतालिकेत सगळे विजय मिळवून 9 गुणांसह 1 नंबरला (केकेआरविरूद्ध अनिर्णित) आहे. तर दुसरीकडं मुंबई इंडियन्सला सलग चौथा पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे 2 गुणांसह मुंबई 9 व्या स्थानावर आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.