RCB vs LSG IPL 2026: आयपीएल 2026 चा 23 वा सामना आज (बुधवार 15 एप्रिल 2026) बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आपल्या घरच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाला भिडणार आहे.
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीनं या हंगामात आतापर्यंत 4 सामने खेळले असून 3 विजयांसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत. मागील सामन्यात त्यांनी मुंबई इंडियन्सला 18 धावांनी धूळ चारली होती. दुसरीकडं, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊचा संघ 4 सामन्यात 2 विजयांसह सातव्या स्थानावर आहे. लखनऊला मागील सामन्यात गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला होता, त्यामुळे लखनऊ आणि त्यांच्या चाहत्यांना आशा आहे की, आज आरसीबीविरूद्ध ते पुनरागमन करतील. तसेच आससीबीच्या संघाला आणि चाहत्यांना सुद्धा हीच अपेक्षा असेल की, आजचा सामना जिंकून गुणांमध्ये आणखी भर टाकतील.
आमनेसामने रेकॉर्ड (Head to Head)
आयपीएल इतिहासात या दोन संघांमधील लढत नेहमीच चुरशीची ठरली आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 6 सामन्यांपैकी आरसीबीनं 4 तर लखनऊनं 2 सामन्यांत बाजी मारली आहे. चिन्नास्वामीची खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन मानली जाते, त्यामुळे आज धावांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
आजची संभाव्य प्लेइंग 11
RCB– फिल साल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (WK), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जेकब डफी/जोश हेझलवूड
LSG: एडन मार्करम, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कॅप्टन/WK), निकोलस पूरन, आयुष बदोनी, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मोहम्मद शमी, आवेश खान, मोहसिन खान, मयंक यादव

