जावोखिर सिंदारोव्ह ठरला नवा चॅलेंजर; कॅन्डिडेट्स २०२६ चे जेतेपद नावावर

निकोशिया (सायप्रस): उझबेकिस्तानचा 20 वर्षीय ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव्ह ठरला नवा चॅलेंजर; कॅन्डिडेट्स २०२६ चे जेतेपद नावावर सिंदारोव्ह यानं सायप्रसमध्ये सुरू असलेल्या ‘फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट 2026’ मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं आहे. मंगळवारी (14 एप्रिल 2026) पार पडलेल्या 13 व्या (उपउपांत्य) फेरीत सिंदारोव्हनं नेदरलँड्सच्या अनिश गिरीला बरोबरीत (Draw) रोखलं. या एका गुणाच्या भरसह सिंदारोव्हनं एक फेरी शिल्लक असतानाच स्पर्धेचं सुवर्णपदक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याचं तिकीट निश्चित केलं आहे. आता तो भारताच्या सध्याच्या जागतिक चॅम्पियन डी. गुकेशला आव्हाहन देईल.

सिंदारोव्हनं या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून एकतर्फी वर्चस्व गाजवलं आहे. 13 व्या फेरीत अनिश गिरी विरुद्ध खेळताना त्यानं अत्यंत संयमी खेळ दाखवला घेतला. या सामन्यात त्यानं ‘क्वीन्स गॅम्बिट डिक्लाईन्ड’ या बचावाचा वापर केला आणि कोणत्याही धोक्याशिवाय सामना बरोबरीत सोडवला. सिंदारोव्हनं आतापर्यंत 13 फेऱ्यांत 9.5 गुण मिळवले असून, त्यानं 6 विजय आणि 7 बरोबरी असा शानदार विक्रम केला आहे. त्यानं या स्पर्धेत हिकारू नाकामुरा, फॅबियानो कारुआना आणि भारताच्या आर. प्रज्ञानंद सारख्या दिग्गजांना पराभूत करून जागतिक बुद्धिबळात खळबळ माजवून दिली आहे.

या स्पर्धेत भारतीय चाहत्यांच्या नजरा आर. वैशालीवर लागल्या आहेत. महिला विभागात वैशाली आणि कझाकस्तानची बिबिसाया असाउबायेवा 12 फेऱ्यांनंतर 7.5 गुणांसह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. 15 एप्रिल रोजी होणारी शेवटची फेरी महिला विभागातील विजेता ठरवेल. दुसरीकडं, पुरुष गटातील भारताचा एकमेव खेळाडू आर. प्रज्ञानंद 13 व्या फेरीत फॅबियानो कारुआनासोबत बरोबरीत राहिल्यानं 5 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. तर दिव्या देशमुख ही महिला गटात 5 गुणांसह सातव्या स्थानावर असून, पदक मिळवण्याच्या शर्यतीतून ती बाहेर पडली आहे.

सिंदारोव्हचा या स्पर्धेतील शेवटचा सामना (फेरी 14) चीनच्या वेई यी (Wei Yi) विरुद्ध बुधवारी, 15 एप्रिल 2026 रोजी खेळवला जाणार आहे. जरी तो आधीच विजेता ठरला असला, तरी जास्तीत जास्त गुण मिळवून विक्रम प्रस्थापित करण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. या स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर, वर्षाच्या अखेरीस होणारा डी. गुकेश विरुद्ध सिंदारोव्ह, हा सामना इतिहासातील सर्वात तरुण जागतिक अजिंक्यपद सामना म्हणून ओळखला जाईल. त्यामुळे या सामन्याकडं अनेक चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी हेही वाचा
सुजीतने अंतिम फेरीत जपानी मल्लाचा पराभव करत मिळवले सुवर्णयश-
https://agcsport.tv/other/sujith-defeated-a-japanese-wrestler-in-the-final-to-win-the-gold-medal/

रग्बीचा दुसऱ्या हंगामाची जूनमध्ये होणार सुरूवात-https://agcsport.tv/other/the-second-season-of-rugby-will-begin-in-june/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.