PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2026 दरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान यांच्या संदर्भात सोशल मीडियावर एक खळबळजनक चर्चा सुरू आहे. व्हायरल ट्विट्सनुसार, रिझवाननं वॉर्नरवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला असल्याचा दावा केला जात आहे, ज्यामुळे वॉर्नरनं स्पर्धा अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
प्रकरण काय आहे?
एप्रिल 2026 च्या सुरुवातीला काही सोशल मीडिया युझर्सनी असा दावा केला की, रिझवाननं वॉर्नरला ड्रेसिंग रूम आणि हॉटेलमध्ये इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आणि नमाज पठण करण्यासाठी वारंवार गळ घातली. इतकेच नाही तर, एका व्हायरल दाव्यानुसार रिझवाननं वॉर्नरला सांगितलं की, जर त्यानं इस्लाम स्वीकारला तर त्याला पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (Head Coach) बनवलं जाईल. मात्र, या दाव्यांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) यावर भाष्य केलेलं नाही.
जुना किस्सा: श्रीलंकन खेळाडूशी वाद
2014 मध्ये असाच एक किस्सा श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानसोबत घडला होता. त्यावेळी पाकिस्तानचा फलंदाज अहमद शहजाद यानं मैदानातून बाहेर जाताना दिलशानला म्हटलं होतं की, “जर तू मुस्लीम नसशील आणि मुस्लीम झालास, तर आयुष्यात काहीही केलं तरी तुला थेट जन्नत (स्वर्ग) मिळेल”. दिलशाननं काही न ऐकल्यासारखे दाखवल्यावर शहजादनं “तर मग आगीसाठी तयार राहा” असंही म्हटलं होतं. या घटनेनंतर पीसीबीनं शहजादवर शिस्तभंगाची कारवाई केली होती.
Pakistani Cricketer Ahmed Shehzad attempted to convert non muslim Sri Lankan cricketer Dilshan to Islam on field and threatened him with hell fire. pic.twitter.com/sKmgyhiquk
— Incognito (@Incognito_qfs) October 15, 2023
वॉर्नरनं PSL का सोडली?
डेविड वॉर्नरनं कौटुंबिक कारणास्तव (विशेषतः इस्टर सुट्टीसाठी) पीएसएलमधून तात्पुरता ब्रेक घेतला होता. मात्र, ऑस्ट्रेलियात परतल्यानंतर त्याला ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ (Drunk and Drive) केसमध्ये अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली. या कायदेशीर गुंतागुंतीमुळे आणि पुढील महिन्यात होणाऱ्या कोर्टाच्या सुनावणीमुळे तो उर्वरित स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे.
वॉर्नरची PSL 2026 मध्ये कराची किंग्सचा कर्णधार म्हणून वॉर्नरनं या हंगामात चांगली सुरुवात केली होती. त्यानं एकूण 4 सामने खेळले असून 93 धावा केल्या, ज्यात एका अर्धशतकाचा (50 धावा) समावेश होता.

