CSK vs DC; IPL 2026 MS and Brevis: आज 11 एप्रिल 2026 सीएसकेचा सामना दिल्लीविरूद्ध होणार आहे. आणि चेन्नई सुपर किंग्सचे चाहते महेंद्र सिंग धोनीला खेळताना पाहण्यासाठी आतुरलेले आहेत. आयपीएल सुरु होण्याआधीच दुखापतीमुळे धोनी काही सामन्यांत खेळणार नाही अशी माहिती संघाचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली होती. त्यामुळे आजचा सामना तो खेळणार का, याकडे सीएसके चाहत्यांचं लक्ष लागल आहे.
आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाची सध्याची परिस्थिती बिकट आहे. सीएसकेला सलग तीन पराभव स्वीकारावे लागले आहेत आणि त्यामुळे सीएसके गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. आणि या तीनही सामन्यांत धोनी दुखापतीच्या (पायाची दुखापत) कारणामुळे खेळला नव्हता. त्यातच आता संघाचे (CSK) मुख्य कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी एसएस धोनीच्या सध्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली आहे.
फ्लेमिंग यांनी सीएसके आणि दिल्ली यांच्यातील सामन्याआधी धोनीविषयी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “धोनी पुनरागमासाठी खूप मेहनत घेत आहे आणि लवकरच खेळायला सुरूवात करेल”. पण कोचनं धोनीच्या खेळण्याबाबतची कोणती तारीख सांगितली नाही.
त्यामुळे धोनी आजचा सामना खेळणार का नाही याबाबत थोडी शंका व्यक्त केली जात आहे. पण सीएसकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी सुद्धा आहे. गेल्या काही सामन्यात दुखापतीमुळे खेळत नसलेला स्टार फलंदाज डेवाल्ट ब्रेविस हा आजचा दिल्लीविरूद्धचा सामना खेळणार आहे. अशी माहिती त्यानं एका कार्यक्रमात स्वत: दिली आहे.
धोनी नसतानी सीएसके
पाच वेळेचा आयपीएल विजेता असलेली सीएसके संघाला या हंगामात सुरुवातीच्या सलग तीन पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. आणि या तिन्ही सामन्यात सीएसकेचा माजी कर्णधार MS धोनी खेळला नाही. सीएसके संघाचं धोनी नसताना अतिशय खराब रेकॉर्ड आहे. धोनी आतापर्यंत 7 सामन्यात खेळला नाही. त्यातल्या 6 सामन्यात सीएसकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. धोनी नसताना शेवटचा सामना सीएसकेनं 2010 साली जिंकला होता.

