अर्जुन तेंडुलकरची भविष्यवाणी ठरली खरी

Mukul Choudhari: आयपीएल 2026 ची सुरूवात होण्याआधीच अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) यानी लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) एका खेळाडूबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली होती. आणि ती भविष्यवाणी एकदम खरी ठरली आहे. 9 एप्रिलला जेव्हा लखनऊचा संघ कोलकत्ता नाईट रायडर्सच्या (KKR) विरूद्ध खेळायला उतरला आणि त्या खेळाडूनं जेव्हा हा सामना जिंकून दिला तेव्हा अर्जुनचं ते विधान सोशल मीडियावर आता चांगलचं व्हायरल होत आहे.

अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएल हंगामात लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळत आहे. दरम्यान त्याला आयपीएल 2026 मध्ये आणखी एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. पण त्याला या हंगामाच्या सुरूवातीला एका मुलाखतीत लखनऊच्या काही खेळाडूंविषयी विचारलं होतं. हे पण विचारलं होतं की, असा कोणता खेळाडू आहे जो येणाऱ्या काळात मोठा स्टार होऊ शकतो.

यावर अर्जुननं उत्तर दिलं की, असं नावं प्रेडिक्ट करणं (अंदाज लावणं) ठीक नाही किंवा सांगू शकत नाही. तरी पण त्याला पुन्हा विचारण्यात आलं की, कोण आहे असं जो लांब लांब षटकार लावू शकतो.

यावर अर्जुननं सांगितलं की, मुकुल चौधरी चांगल्या पद्धतीनं षटकार मारतो, सराव सामन्यात त्याचे षटकार पाहून मी प्रभावित झालो होतो. म्हणजे की त्यानं सगळ्या बाजूला षटकार लावले होते. पॉईंटच्या दिशेनं, समोर, मागे, अप्परकट अशा सगळ्या बाजूनं त्यानं षटकार मारले आहेत.

दरम्यात, अर्जुनचा हा अंदाज 9 एप्रिल 2026 ला खरा ठरला. जेव्हा मुकुल चौधरीनं आक्रमक फलंदाजी आणि गगनाला भिडणारे षटकार लावून आपल्या संघाला जिंकून दिलं. मुकुल चौधरीनं केकेआरच्याविरूद्ध 27 चेंडूत 54 धावा काढल्या. त्यानं या 27 चेंडूत 7 चौकार आणि 2 चौकार लावले. 128 वर 7 विकेट्स असताना मुकुलनं जबरदस्त फलंदाजी करत केकेआरच्या हातातून हा सामना काढून आपल्या बाजूनं वळवला आणि शेवटी 3 गडी राखून विजय मिळवला.

मुकुल चौधरीला आयपीएलमध्ये किती रूपयांना विकत घेतलं?
मुकुल चौधरी राजस्थानच्या घरच्या मैदानावर खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 मध्ये जबरदस्त फलंदाजी करत 5 डावात 173 धावा काढल्या. आणि तिथं त्याचा स्ट्राईक रेट 198.85 होता. हीच आक्रमक फलंदाजी पाहून लखनऊ सुपर जायंट्सनं IPL 2026 मध्ये मुकुलला 2.60 करोड रूपयांना खरेदी केलं.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.