कोलकत्ता पंजाबचा सामना पावसामुळे रद्द

IPL 2026 KKR vs PBKS: सोमवारी (6 एप्रिल 2026) कोलकत्त्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर रंगलेला कोलकता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यातील सामना मुसळधार पावसामुळे अनिर्णित (No Result) राहिला. सामन्याची सुरुवात अपेक्षेप्रमाणे वेळेवर झाली होती आणि केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे यानं नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, चाहत्यांचा उत्साह फार काळ टिकला नाही, कारण खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांतच पावसानं हजेरी लावली आणि सामना थांबवावा लागला.

केकेआरच्या डावातील फक्त 3.4 षटके पूर्ण झाली असताना पावसाचा जोर वाढला आणि पंचांनी खेळाडूंना मैदानाबाहेर जाण्याचा इशारा दिला. त्या वेळी केकेआरची अवस्था 2 बाद 25 अशी नाजूक होती. पाऊस थांबण्याची बराच वेळ प्रतीक्षा करण्यात आली, मात्र ईडन गार्डन्सची आऊटफिल्ड ओले असल्यामुळे आणि खेळपट्टीवर पाणी साचल्यामुळे रात्री 11:03 वाजता पंचांनी सामना रद्द करण्याचा अधिकृत निर्णय घेतला. या अनिर्णित निकालानंतर नियमानुसार दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण विभागून देण्यात आला.

आमने-सामने रेकॉर्ड
ऐतिहासिक रेकॉर्डवर नजर टाकली तर, ईडन गार्डन्सवर केकेआरचा दबदबा कायम आहे. येथे या दोन संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या 14 सामन्यांपैकी 9 सामन्यांत केकेआरनं विजय मिळवला आहे, तर 5 सामन्यांत पंजाबला बाजी मारता आली आहे. एकूण आयपीएल इतिहासात दोन्ही संघ 36 वेळा आमनेसामने आले असून त्यात केकेआर 21-13 अशा फरकानं आघाडीवर आहे. (कालचा सामना सोडून एक सामना अनिर्णित)

काल झालेल्या रद्द सामन्यामुळे दोन्ही संघाला प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आले. यासह पंजाब किंग्स 5 गुणांसह गुणतालिकेत अव्वल (पहिल्या) स्थानी पोहोचला आहे, तर कोलकत्त्यानं या हंगामातील आपला पहिला गुण मिळवत आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. केकेआरचा आता पुढचा सामना पुन्हा एकदा घरच्या मैदानावर 9 एप्रिल 2026 रोजी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध रंगणार आहे. तर पंजाब किंग्सचा सामना सनराजर्स हैदराबाद विरूद्ध 11 एप्रिलला खेळणार आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.