आरसीबी सलग दुसऱ्या विजयासाठी तर सीएसके पहिल्या विजयासाठी सज्ज!

IPL 2026: आयपीएल 2026 मधील आजचा (रविवार, 5 एप्रिल 2026 रोजी) सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि पाचवेळा विजेतेपद पटकावलेला चेन्नई सुपर किंग्स (CSK) हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता आमनेसामने येतील.

आरसीबीनं आपल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवून हंगामाची दमदार सुरुवात केली. सध्या 1 सामन्यात 1 विजयासह 2 गुण मिळवून आरसीबी चौथ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडं, चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली आहे. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सविरुद्ध सलग दोन पराभवं पत्करावं लागल्यामुळे सीएसके सध्या शून्य गुणांसह गुणतालिकेत सर्वात शेवटच्या (10 व्या) स्थानावर आहे.

आमने-सामने (Head-to-Head) रेकॉर्ड
आयपीएलच्या इतिहासात या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 36 सामने झाले आहेत. आकडेवारीनुसार चेन्नईचे वर्चस्व अधिक असून त्यांनी 22 सामने जिंकले आहेत, तर आरसीबीला 13 सामन्यांत विजय मिळवता आला आहे (1 सामना अनिर्णित). मात्र, चिन्नास्वामी स्टेडियमवरील रेकॉर्ड अतिशय चुरशीचा आहे. येथे झालेल्या 12 सामन्यांपैकी आरसीबीनं 6 तर चेन्नईनं 5 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, आरसीबीनं सीएसकेविरुद्ध मागील सलग तीनही सामने जिंकून आपलं पारडं जड ठेवलं आहे.

आजची संभाव्य प्लेइंग 11
आरसीबी (RCB): विराट कोहली, फिल साल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, मयंक यादव, रसिक सलाम डार.

सीएसके (CSK): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, शिवम दुबे, सरफराज खान, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.