IPL and PSL: ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ॲडम झम्पानं यावर्षी आयपीएल 2026 च्या लिलावातून माघार घेतली होती आणि तो सध्या पीएसएलमध्ये कराची किंग्स (Karachi Kings) संघाकडून खेळत आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यानं या धक्कादायक निर्णयामागचं खरं कारण स्पष्ट केलं आहे.
झम्पा काय म्हणाला
झम्पानं नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आणि ‘ARY न्यूज’च्या पॉडकास्टमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “माझ्या कौशल्याच्या (लेग-स्पिनर) खेळाडूंना आयपीएलमध्ये इतर खेळाडूंच्या तुलनेत योग्य मोबदला मिळत नाही. आयपीएलचं वेळापत्रक दोन ते अडीच महिन्यांचं असतं. इतका मोठा वेळ देऊनही मिळणारा पैसा माझ्यासाठी पुरेसा नव्हता. त्यामुळे इतका वेळ घालवणं मला योग्य वाटलं नाही”. त्यानं असंही सांगितलं की, तो सुरुवातीला विश्रांती घेणार होता, पण पीएसएलचा पर्याय समोर आल्यावर त्यानं तिकडं खेळणं पसंत केलं कारण पीएसएलचं वेळापत्रक आयपीएलच्या तुलनेत लहान आहे.
🚨 ADAM ZAMPA OPENES UP WHY HE CHOSE TO PLAY PSL OVER IPL: 🇵🇰>🇮🇳
— Abdullah. (@Abdullahh_56) March 31, 2026
Adam Zampa said, "I pulled out of the IPL this year. To be brutally honest, for someone with my skill set, I just don’t get the money that is there for other skill sets. And for the amount of time that the IPL… pic.twitter.com/7nhawPpnEX
एकीकडं झम्पानं पीएसएल निवडली असली तरी, काही खेळाडूंनी याउलट पीएसएल सोडून आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्लेसिंग मुझाराबानी (Blessing Muzarabani – KKR कडे), दसुन शनाका (Dasun Shanaka), गूडाकेश मोती (Gudakesh Motie) आणि स्पेन्सर जॉन्सन (Spencer Johnson) यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांनी आयपीएलमधील आर्थिक फायद्याला पसंती दिली.
आयपीएल किती मोठी लीग आहे?
इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान स्पोर्ट्स लीग आहे. अमेरिकेतील ‘नॅशनल फुटबॉल लीग’ (NFL) नंतर प्रति सामना मूल्याच्या (Per Match Value) बाबतीत आयपीएलचा जगात दुसरा क्रमांक लागतो. 2026 पर्यंत आयपीएलच्या संपूर्ण इकोसिस्टमचं व्यावसायिक मूल्य सुमारे $18.5 अब्ज (सुमारे 1.56 लाख कोटी रुपये) इतकं झालं आहे. इतकी मोठी लीग असून सुद्धा झम्पानं पीएलएलला पसंती दिली आहे यामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
इम्पाची आयपीएल कारकीर्द
2016 सालापासून आयपीएल खेळत असलेल्या झम्पानं आतापर्यंत एकूण 22 सामने खेळले असून त्यात 31 बळी घेतले आहेत. तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या फ्रेंचायझींकडून खेळला आहे.
तर पीएसएल 2026 मधील आकडेवारीनुसार सध्या कराची किंग्ससाठी खेळताना त्यानं 3 सामन्यांत 3 बळी घेतले आहेत, ज्यात लाहोर कलंदर्स विरुद्ध 11 धावांत 2 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) मध्ये ऑस्ट्रेलियासाठी त्यानं 115 सामन्यांत 147 बळी घेतले आहेत.

