भारतीय पिकल बॉल संघाची ‘यूएस ओपन’ साठी घोषणा!

IPA US Open Pickleball 2026: भारतीय पिकल बॉल असोसिएशननं (IPA) सोमवारी (30 मार्च) अमेरिकेतील नेपल्स, फ्लोरिडा येथे होणाऱ्या यूएस ओपन पिकल बॉल चॅम्पियनशिप 2026 (US Open Pickleball Championships 2026) साठी 10 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात देशातील सर्वोत्तम राष्ट्रीय चॅम्पियन्स आणि उगवत्या ताऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा 9 एप्रिल ते 18 एप्रिल 2026 या कालावधीत नेपल्स, फ्लोरिडा (अमेरिका) येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेत जगभरातील अनेक देशांचे खेळाडू सहभागी होणार असून, ही पिकल बॉल जगातील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. त्यामुळे या स्पर्धेकडे अनेक चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

अध्यक्ष सूर्यवीर सिंह भुल्लर यांची प्रतिक्रिया
आयपीएचे अध्यक्ष सूर्यवीर सिंह भुल्लर यांनी या निवडीवर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “हा खेळाडूंचा गट भारतातील पिकल बॉलच्या झपाट्यानं होणाऱ्या प्रगतीचं प्रतीक आहे. आमचे खेळाडू कोच धिरेंन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक स्तरावर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहेत. ही स्पर्धा त्यांना सिंगापूर आणि व्हिएतनाममधील आगामी जागतिक स्पर्धांसाठी मोठा अनुभव देईल”

भारतीय संघ आणि त्यांचे गट (Categories)
या संघात एकूण 10 खेळाडू असून त्यांचं नेतृत्व अनुभवी धिरेंन पटेल (खेळाडू आणि प्रशिक्षक) करणार आहेत. खेळाडूंची विभागणी

ओपन कॅटेगरी (Open)- मिहिका यादव (नॅशनल चॅम्पियन), अर्जुन सिंह, पूर्वांश पटेल आणि आदित्य सिंह
18 वर्षांखालील मुली (U-18)- नागा मोक्ष (नॅशनल चॅम्पियन)
16 वर्षांखालील गट (U-16)- जीत सूद आणि युवराज सिंह
सब-ज्युनिअर गट- पंथ ठक्कर आणि अथर्व शेठ
40 वर्षांवरील प्रो एकेरी- धिरेंन पटेल
50 वर्षांवरील गट (50+)- सूर्यवीर सिंह भुल्लर (पुरुषांचे दुहेरी आणि मिश्र दुहेरी)

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.