धोनीशिवाय सीएसके किती वर्षांपुर्वी जिंकला होता?

IPL 2026 CSK vs RR: आयपीएल 2026 मध्ये काल (सोमवार, 30 मार्च) झालेल्या चेन्नई आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात राजस्थाननं 2026 मधील पहिला विजय मिळवला आहे. हा सामना बरसापारा स्टेडियम, गुवाहाटी येथे पार पडला. या सामन्यात रॉयल्सनं 8 बळी ( wicket) राखून सीएसकेवर विजय मिळवला.

राजस्थान रॉयल्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसके (CSK) संघाला सुरूवातीपासून फलंदाजीसाठी संघर्ष करावा लागला. कारण सीएसकेच्या सुरूवातीलाच कर्णधार ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसंग, आयुष म्हात्रे आणि मॅथ्यू शॉर्ट या चौघांच्या विकेट्स पॉवरप्लेमध्येच पडल्या. त्यामुळे सीएसकेवर दबाव वाढला होता. सीएसकेच्या पॉवरप्लेमध्येच 41 धावांवर 4 विकेट्स गेल्या होत्या. त्यानंतर रवींद्र जडेजाच्या 8 व्या षटकात (overs) तर त्यानं दोन विकेट घेतल्या आणि त्यामुळे सीएसके आणखीनच बॅकफूटवर गेला. अशीही एक वेळ आली की, सीएसके 100 धावांचा टप्पा पार करणार का नाही, असा प्रश्न निर्माण झाला. पण अष्टपैलू खेळाडू जिमी ओव्हर्टन यानं 43 धावांची चांगली खेळी केली आणि सीएसकेला त्याच्या जोरावर 127 धावा करता आल्या.

प्रत्युत्तरात उतरलेला राजस्थान रॉयल्स संघ सुरूवातीलाच सीएसकेच्या गोलंदाजांवर तुटून पडला. वैभव सुर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल या सलामीच्या जोडीनं पॉवरप्लेमध्ये 74 धावा कुटल्या. यात वैभव फक्त 15 चेंडूतच अर्धशतकी खेळी करून बाद झाला. अंशुल कंबोज यानंच त्याच्या पुढच्या षटकात यशस्वी जयस्वाल याचीही विकेट घेतली. कंबोज यानं सीएसकेसाठी दोन विकेट घेतल्या पण तोपर्यंत गेम सीएसकेच्या हातातून गेला होता. शेवटी कर्णधार रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांनी धावा सुरूच ठेवल्या आणि दोघांनीही नाबाद राहून राजस्थानला आयपीएल 2026 चा पहिला विजय मिळवून दिला.

धोनीशिवाय सीएसके
सीएसकेचा माजी कर्णधार धोनी हा आयपीएल 2026 मध्ये काही सामने खेळणार नाही. पण त्याच्या अनुपस्थितीत सीएसके संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. सीएसकेनं धोनीशिवाय सामना तब्बल 16 वर्षांपुर्वी जिंकला होता, म्हणजे 2010 साली. त्याच्यानंतर सीएसके संघाला धोनीशिवाय एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे धोनी कधी मैदानात उतरणार याकडे संघाच्या आणि चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.