विश्वचषक आणि आशियाई खेळांसाठी हॉकी इंडियाकडून ३१ राष्ट्रीय खेळाडूंची निवड

Women’s 2026 hockey: नुकत्याच संपलेल्या एफआयएच (FIH) महिला हॉकी विश्वचषक पात्रता फेरीत रौप्य पदक जिंकून विश्वचषकाचं तिकीट पक्कं केल्यानंतर, भारतीय महिला संघ आता पुढील आव्हानांसाठी सज्ज झाला आहे. त्यानुसार, हॉकी इंडियानं आगामी आंतरराष्ट्रीय हंगामासाठी ३१ खेळाडूंच्या नावांची घोषणा (30 MARCH 2026) केली आहे. नवीन प्रशिक्षक शोअर्ड मारिन (Sjoerd Marijne) यांच्या मार्गदर्शनाखाली संघ बांधणीवर भर दिला जाणार आहे. हे शिबिर 1 एप्रिल ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे.

भारतीय महिला संघानं हैदराबाद येथे झालेल्या विश्वचषक पात्रता फेरीत (8-14 मार्च 2026) दमदार कामगिरी केली. त्यांनी उपांत्य फेरीत इटलीचा 1-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्याच क्षणी महिला हॉकी विश्वचषक 2026 साठी आपली पात्रता निश्चित केली. पात्रता निकषांनुसार, दोन पात्रता स्पर्धांमधील अव्वल तीन संघ आणि चौथ्या क्रमांकावरील सर्वोत्तम रँकिंग असलेला एक संघ विश्वचषकासाठी पात्र ठरणार होता.

Indian Women’s Hockey Team: निवडलेल्या ३१ खेळाडूंची यादी
गोलकीपर्स
: सविता पुनिया, बिचू देवी खारीबाम, माधुरी किंडो आणि बनसरी सोळंकी

डिफेंडर्स: निक्की प्रधान, उदिता, इलिशिका चौधरी, ज्योती सिंग, ज्योती, लालथानतलुआंगी आणि शिल्पी डबास

मिडफील्डर्स: सलिमा टेटे, नेहा, सुशीला चनू पुखरामबम, मनिषा चौहान, वैष्णवी विठ्ठल फाळके, साक्षी राणा, सुनेलिता टोप्पो आणि इशिका

फॉरवर्ड्स: नवनीत कौर, दीपिका, लालरेमसियामी, मुमताज खान, दीपिका सोरेंग, रुतुजा दादासो पिसाळ, बलजीत कौर, अन्नू, ब्युटी डुंगडुंग, हिना बानो, सोनम आणि संगीता कुमारी

Indian Women’s Hockey Team चे मुख्य प्रशिक्षक शोअर्ड मारिन यांनी या शिबिराच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले, “हे शिबिर आमच्यासाठी अत्यंत स्पर्धात्मक हंगामाच्या तयारीतील पुढचं पाऊल आहे. आमचा मुख्य भर सातत्य सुधारणे, संघाची रणनीती आखणे आणि खेळाडू शारीरिक व मानसिकरित्या आव्हानांसाठी कसे तयार राहतील, यावर असेल. आम्हाला असा संघ उभा करायचा आहे जो दबावाखालीही उत्कृष्ट कामगिरी करेल आणि विश्वचषक व आशियाई खेळांसारख्या मोठ्या स्पर्धांत विजय मिळवून देईल”.

आगामी स्पर्धांचे वेळापत्रक
हे प्रशिक्षण शिबिर 1 एप्रिलपासून सुरू होईल. यानंतर Indian Women’s Hockey Team प्रमुख स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे, त्यात, एफआयएच महिला नेशन्स कप जून 2026, महिला हॉकी विश्वचषक ऑगस्ट 2026 आणि आशियाई खेळ (Asian Games)ऑक्टोबर 2026 अशा खेळांमध्ये भारतीय महिला संघ खेळणार आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.