तब्बल 14 वर्षानंतर मुंबई इंडियन्स विजयी

IPL 2026 MI vs KKR: आयपीएलमध्ये नुकत्याच झालेल्या मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात मुंबईनं 6 बळी (विकेट) राखून केेकेआरचा पराभव केला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला.

मुंबईच्या संघानं नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरनं दमदार सुरूवातही केली आणि मुंबईला बॅकफुटवर पाठवलं होतं. मुंबईच्या सगळ्या गोलंदाजांनी केकेआरच्या फलंदाजांना चांगलंच धुवून काढलं. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे यानं चांगली खेळी केली. रहाणेनं 40 चेंडूत 67 धावा केल्या. आणि त्यात 5 षटकार आणि 4 चौकार लगावले. रघुवंशी यानंही अर्धशतक (51 धावा) करत चांगली खेळी केली. फिन ॲलन, रिंकू सिंग यांनीही धावा करण्यात मदत केली. आणि त्यामुळेच केकेआरच्या संघाला 220 धावा करत्या आल्या.

प्रत्युत्तरात उतरलेल्या मुंबईच्या संघानंही जोरदार सुरूवात केली. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित आणि रिआन रिकल्टन या दोघांनी तर केकेआरच्या गोलंदाजांचा धुव्वाच उडवून टाकला. केकेआरच्या कोणत्याही गोलंदाजांना या दोघांची जोडी तोडता येत नव्हती. रोहितनं 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं 78 धावांची खेळी केली तर रिकल्टन यानं 8 षटकार आणि 6 चौकार मारून 81 धावांची खेळी केली. या दोघांनीही मुंबईला एका चांगल्या स्थिती आणलं. त्यानंतर सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांनीही धावा सुरूच ठेवल्या आणि सामना पुर्णपणे मुंबईकडं वळवला. शेवटी हा सामना मुंबईनं 6 बळी राखून जिंकला.

14 वर्षांपुर्वी जिंकला होता सामना
गेल्या अनेक वर्षापासून मुंबई इंडियन्सला आपला आयपीएलचा पहिला सामना जिंकता आला नव्हता. त्यांनी आयपीएलचा पहिला सामना तब्बल 14 वर्षांपुर्वी, म्हणजेच 2012 ला जिंकला होता. पण हा नकोसा असलेला रेकॉर्ड त्यांनी काल (29 मार्च) झालेल्या सामन्यात मोडून काढला. मुंबईनं आयपीएलचा पहिलाच सामना जिंकून यंदाच्या वर्षाची चांगली सुरूवात केली.

पदार्पणातच प्लेअर ऑफ द मॅच
यंदाच्या आयपीएलसाठी मुंबईनं शार्दुल ठाकूर याला आपल्या संघात सामिल केलं होतं. त्यानं पहिल्याच सामन्यात आपला जलवा दाखवला. पदार्पणातच त्यानं 4 षटकांत (ओव्हर्स) 39 धावा देऊन 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे मुंबईच्या संघाला सामन्यात पुनरागमन करता आलं होतं. शेवटी मुंबई जिंकल्यावर शार्दुललाच प्लेअर ऑफ द मॅच देण्यात आलं.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.