21 वर्षांनंतर मोडला विक्रम: सलोनी कुमारीची सुवर्ण भरारी!

National Indoor Athletics Championship 2026: ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. कलिंगा स्टेडियमवर आयोजित पहिल्या नॅशनल इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये उत्तर प्रदेशच्या 21 वर्षीय सलोनी कुमारीनं ट्रॅकवर इतिहास घडवला आहे. सलोनीनं महिलांच्या 400 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावताना 21 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.

विक्रमी कामगिरी
सलोनीनं ही शर्यत 53.73 सेकंदात पूर्ण केली. यापूर्वी हा विक्रम पिंकी प्रामाणिक यांच्या नावे होता. त्यांनी 2005 मध्ये 53.89 सेकंद अशी वेळ नोंदवली होती. सलोनीनं 0.16 सेकंदांच्या फरकानं हा विक्रम आपल्या नावी केला आहे.

इतर भारतीय खेळाडूंची कामगिरी
या स्पर्धेत सलोनी व्यतिरिक्त इतर अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय विक्रमांसह पदकांची कमाई केली आहे.

  • पुरूषांच्या 60 मीटर धावण्याच्या शर्यतीत पंजाबच्या गुरिंदरवीर सिंग यांनी 6.60 सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.
  • ओडिशाच्या लालू प्रसाद भोई यांनीही 60 मीटर शर्यतीत 6.65 सेकंद वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकलं आहे.
  • रीगन गणेश या तमिळनाडू खेळाडूनं पुरुषांच्या पोल वॉल्टमध्ये 5.30 मीटर उंची गाठून सुवर्ण पदक जिंकलं आहे. तसेच ही इनडोअरमधील भारतीय खेळाडूची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
  • विनाेद सिंग या मध्य प्रदेश खेळाडूनं 1500 मीटर शर्यतीत 3:46.13 सेकंद वेळ नोंदवून सुवर्ण पदक मिळवलं.
  • महाराष्ट्राच्या हरिता भद्रा हिनं 60 मीटर महिला शर्यतीत 7.32 सेकंद वेळेसह सुवर्ण पदक पटकावले.
  • तसेच स्वाधीन कुमार माझी या ओडिशा प्लेअरनं उंच उडीत (High Jump) 2.18 मीटर कामगिरीसह सुवर्ण पदक जिंकलं आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.