आंद्रे रसलला मिळाला खास सन्मान

IPL 2026: कोलकत्ता नाईट रायडर्सनं IPL 2026 च्या आधीच संघातील एका दिग्गज खेळाडूच्या सन्मानार्थ एक खास जर्सीला रिटायर केलं आहे. संघानं ही जर्सी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. तर चला जाणून घेऊ केकेआर फ्रेंचाइजीच्या कोणत्या खेळाडूच्या सन्मानार्थ ही जर्सी कायमस्वरूपी रिटायर केली आहे.

हा दुसरा कोणताही खेळाडू नाही तर, वेस्टइंडीज संघाचा all rounder खेळाडू आंद्रे रसल आहे. ज्याच्या सन्मानार्थ केकेआर संघानं 12 नंबरची जर्सी रिटायर केली आहे. रसलनं आगामी सिजनच्या आधीच आयपीएलला रामराम केला होता. आणि निवृत्ती घेतली होती.

झालं असं की, केकेआर फ्रेंचाइजीनं यावर्षाच्या आयपीएलला रसलला रिलीज केलं होतं, ज्यामुळे रसलनं दुसऱ्या टीमकडून न खेळण्याचा निर्णय घेतला आणि आयपीएलमधून रिटायरमेंट घेतली. दरम्यान आता निवृत्ती नंतर तो केकेआरचा ‘पॉवर कोच’ ची भूमिका पाहणार आहे. त्यामुळे जरी त्यानं निवृत्ती घेतली असली तरीही तो केकेआरचा एक भाग म्हणून संघासोबतच राहणार आहे.

केकेआर साठी खेळलेले सामने
रसलनं आपल्या पुर्ण आयपीएल कारकिर्दीत एकूण 140 सामने खेळले, त्यातले त्यानं केकेआरसाठी 133 सामने खेळले आहेत. तो 13 हंगाम आयपीएलचा हिस्सा राहिला आहे. ज्यात रसलनं 11 हंगाम कोलकत्ता नाईट रायडर्ससाठी खेळले आहेत. त्यानं 2012 मध्ये दिल्ली कॅपिटल्स कडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्याच्यानंतर तो 2013 चा हंगाम सुद्धा दिल्ली संघाकडून खेळला.

नंतर 2014 मध्ये रसलला कोलकत्त्याने आपल्या संघात समावेश करून घेतला. त्यानंतर त्यानं कधीही मागं वळून पाहिलं नाही. 11 हंगाम या (केकेआर) फ्रेंचाइजी कडून खेळल्यानंतर त्यानं निवृत्ती घेतली. नक्कीच आगामी हंगामात रसलच्या निवृत्तीमुळे संघाला त्याची कमी भासेल, कारण तो एक ऑलराऊंडर खेळाडू आहे.

रसलचे आयपीएल करिअर
त्यानं 140 सामने खेळले आहेत आणि 115 इनिंगमध्ये त्यानं 28.2 च्या सरासरीनं 2651 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 12 अर्धशतक सुद्धा आहेत. तर दुसरीकडं गोलंदाजी करताना त्यानं 121 डावांत 23.27 च्या सरासरीनं 123 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.